हजारोंचा जनसागर उसळणार, श्रोत्यांना भाषणाची उत्सुकता
कणकवली | मयुर ठाकूर : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या जाहीर प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुख मैदान तोफ आज कणकवलीत धडाडणार आहे. आज ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जनसागर उपस्थिती राहणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी उपजिल्हा रुग्णालया समोरील याच मैदानावर काल सभा घेतली होती.या सभेला जशास तसे आज ठाकरे यांच्याकडून दिले जाईल.त्यामुळे आजची ही सभा ऐकण्यासाठी श्रोतेवर्ग उत्सुक आहेत. दरम्यान शिवसेनेत असताना नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र बैठका जाहीर सभा झालेल्या होत्या. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली सभा एकाच व्यासपीठावर प्रथमच होत आहे.
अगदी काही वेळातच राज ठाकरे यांच्या सभेला सुरुवात होणार असून मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सभा स्थळी दाखल झाले आहे. राज ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.