22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

कणकवली शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम

कणकवली : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधि- काऱ्यांच्या सूचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने कणकवली शहरात नगरपं- चायत तर्फे मतदारांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे.

स्विप कार्यक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत मतदान जनजागृ- तीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये १० एप्रिल ते १९ एप्रिल २०२४ या दरम्यान मतदार सेल्फी पॉईंट हा उपक्रम, मतदार हस्ताक्षर अभियान, मतदान जनजागृती संदेश देणारे पथनाट्य शहरामध्ये विविध ठिकाणी राबविण्यात आले आहेत. सदर जनजागृती कार्यक्रमाकरीता बचतगटाच्या महिला, शालेय विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व इतर यांनी देखील सहभाग दर्शविला असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

३० एप्रिल रोजी आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे मतदान जनजागृती संदेश देणारी रांगोळी काढण्यात आली. तसेच गुरुवार दिनांक २ मे रोजी सकाळी ८ वा. कणकवली नगरपंचायत कार्यालय ते आप्पासाहेब पटवर्धन चौक अशी लोकशाही दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली शहरातील मतदारांनी यामध्ये सहभागी व्हावे व दि. ७ मे रोजी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!