24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न साडेतीन लाखा पेक्षा जास्त करणार ; महायुतीचे उमेदवार नारायण राणे

दोडामार्ग सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली सह वैभववाडी मध्ये ५०० पेक्षा जास्त कारखाने आणणार

मी आणलेल्या कोकण विकासाच्या प्रकल्पांना उध्दव ठाकरे यांनी कमिशन घेवून विरोध केला

उमेदवार नारायण राणे यांचा कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रचार सभेत घणाघात

कणकवली | मयुर ठाकूर : उद्योजक घडवण्यासाठी,मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळण्यासाठी युवकांना तांत्रिक प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले जाणार आहे.त्यासाठी 200 कोटींचे टेक्निकल ट्रेनिंग सेंटर कुडाळ तालुक्यातील ओरोस मध्ये उभारत आहे. दोडामार्ग कुडाळ आणि कणकवली सह वैभववाडी मध्ये 500 पेक्षा जास्त कारखाने आणणार आहे. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या उपकरणांचे कारखाने दोडामार्ग ला उभारणार आहे. फळप्रक्रिया उद्योग आणणार आणला जाणार आहे.२०२५ पर्यंत येथील जनतेच्या जीवनात आमूलाग्र असा प्रगत विकास करून प्रत्येकाचे वार्षिक
दरडोई उत्पन्न तीन ते साडेतीन लाखा पेक्षा जास्त असेल असा विकास करणार असे आश्वासन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी दिला.
कोकणाला चांगल्या कर्तबगार खासदार,आमदारांची गरज आहे. सिंधुदुर्गातील जनतेने मला सहा वेळा विधानसभेत निवडून दिले म्हणून मी मुख्यमंत्री झालो. मी पहिल्यांदा आमदार होण्याआधी सिंधुदुर्गात रस्ते पाणी वीज ची अपुरी सुविधा होती. महिलांना रोजगाराचे साधन नव्हते. आज जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 2 लाखाच्या वर आहे. आज जिल्ह्यात हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, दर्जेदार रस्ते, मुबलक वीज पाणी पुरवठा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी राणे कुटुंब सदैव झटत आहे.असे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुती चे उमेदवार नारायण राणे यांनी सांगितले. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाची प्रचार सभा असलदे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी राणे बोलत होते.
यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, माजी जि प सदस्य संजय देसाई, पंढरी वायंगणकर, प्रकाश पारकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, उपतालुकाध्यक्ष पूजा जाधव, माजी पं स सभापती भाग्यलक्ष्मी साटम, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ओटव सरपंच रुहिता तांबे, कासार्डे सरपंच निशा नकाशे, दारूम सरपंच तेजस्वी लिंगायत, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, कोळोशी सरपंच आचरेकर असलदे उपसरपंच सचिन परब आदी सह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना नारायण राणे यांनी विरोधी विनायक राऊत यांचाही समाचार घेतला.राऊत यांनी 10 वर्षे खासदारकी काळात एकही विकासकाम केले नाही. उद्या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी केंद्रात मंत्री असणार आहे. उद्योजक घडवण्यासाठी युवकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी 200 कोटींचे टेक्निकल ट्रेनिंग सेंटर ओरोस मध्ये उभारत आहे. दोडामार्ग कुडाळ आणि कणकवली सह वैभववाडी मध्ये 500 पेक्षा जास्त कारखाने आणणार आहे. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या उपकरणांचे कारखाने दोडामार्ग ला उभारणार आहे. फळप्रक्रिया उद्योग आणणार आहोत. चिपी विमानतळाला विरोध करायला विनायक राऊत आघाडीवर होता. मात्र जेव्हा चिपी विमानतळ पूर्ण झाल्यानंतर उदघाटन करताना स्वागताला विनायक राऊत होता. राऊतांनी थोडीतरी लाज बाळगावी. सी वर्ल्ड ला विनायक राऊत ने विरोध केला. विजयदुर्ग ला 4 हजार कोटींचे आधुनिक बंदर होत असताना त्यालाही राऊत ने विरोध केला. मायनिंग मध्ये जाऊन राऊत चा मुलगा हफ्ते घेतो. 3 लाख कोटी गुंतवणूक असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प सुद्धा नको म्हणत राऊत ने विरोध केला. जैतापूर चा औष्णिक ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे ने काही उद्योजकांकडून कोट्यवधी रुपये घेत विरोध केला. कोकणात राऊत ने एकही प्रकल्प आणला नाही. भाजपा संविधान बदल करणार असा खोटा प्रचार केला जातोय. काँग्रेस राजवटीत 80 वेळा राज्य घटनेत बदल केला
संविधान बदल करणार असा खोटा प्रचार केला जातोय. काँग्रेस राजवटीत 80 वेळा राज्य घटनेत बदल केला. अब की बार मोदी तडीपार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंची राणे यांनी हजेरी घेतली. तू केवढा आहेस? 5 खासदार तुझे. मोदींचे नाव घेताना लाज वाटत नाही ? उद्धव ठाकरे अविचारी बोलतो. हिंदुत्व सोडून स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसला. कोव्हीड काळात टेंडर मध्ये 15 टक्के कमिशन उद्धव आदित्य ने घेतले. दिशा सालियान वर अत्याचार करून तिला ठार मारले. या सगळ्याची चौकशी सुरू असून लवकरच हे गजाआड असतील. कोकण विकासाला विरोध करणाऱ्या उबाठा शिवसेनेचे दुकान कायमचे बंद करा असे आवाहन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!