21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

अनाथ निराधारांचे हक्काचे आश्रयस्थान म्हणजे पणदूर येथील सविता आश्रम – राजेंद्र पेडणेकर

माऊली मित्र मंडळ कणकवली च्या वतीने पणदूर आश्रम येथे २०० निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

संदीप परब अनाथांचे देवदूत आणि आधारवड

कणकवली : जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर पूर्वी इतक्याच जिव्हाळ्याने आणि जिद्दीने अनाथांचा आधारवड बनण्याचे काम करत असुन आपण समाजाचे देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन जीवन आनंद संस्था काम करत आहे. असे गौरवोद्गार माऊली मित्र मंडळ कणकवलीचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी काढले.

कुडाळ तालुक्यातील पणदूर आश्रम येथे ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माऊली मित्र मंडळाचे प्रदीप मसुरकर, अविनाश गावडे, सुभाष उबाळे, भगवान कासले , यांच्यासह पणदूर आश्रमाचे आशिष कांबळे, माधव पाटील, रमेश पाटील, हरेश वालावलकर राजेंद्र राणे गजानन घाडी राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते.

माऊली मित्र मंडळ कणकवली च्या वतीने पणदूर आश्रम येथील २०० निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांना खेळण्यासाठी विशेष भेट म्हणून नवीन कॅरम बोर्ड प्रदान करण्यात‌ आले. माऊली मित्र मंडळाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी अन्नधान्य ‌सविता आश्रम येथे अन्नदान वाटप करण्यात आले होते. याचीच आठवण म्हणून आणि समाजाचे देणे लागतो या भावनेतून आज २०० अनाथांना अन्नधान्य वाटप करुन सेवाभावी उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन पेडणेकर यांनी केले.

यावेळी माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर म्हणाले की, जीवन आनंद संस्था, निराधार ,अंध अपंग, मतिमंद, मनोरुग्ण, वृद्ध व मुलांना‌‌ आधार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. संदीप परब हे गोरगरीब अनाथांचे नाथ असुन देवदूत बनले आहेत

यावेळी मंडळाचे सदस्य प्रदीप मसुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ‌ जीवन आनंद संस्था पणदूरच्या वतीने माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर आणि त्यांच्या मंडळाच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. तसेच माऊली मित्र मंडळाचे आभार मानण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!