17.9 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

नारायण राणेंना बांदा शहरातून सर्वाधिक मताधिक्य देणार – जावेद खतीब | बांद्यात घरोघरी प्रचारावर भर

बांदा : भाजप महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांना बांदा शहरातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचा निर्धार बांद्याचे माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी केला आहे. बांदा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.

श्री खतीब म्हणाले की, बांदा शहरात भाजपचे निर्विवाद वर्चस्व असून शहरातून मंत्री राणे यांना ९० टक्के मतदान देण्यात येणार आहे. यासाठी नियोजनपूर्वक प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून शहरात घरोघरी प्रचारावर भर देण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी बांदा शहरातून नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात येत असून याचा फायदा निश्चितच महायुतीचे उमेदवार राणे यांना मिळणार आहे.

प्रभाग क्रमांक दोन मध्ये यावेळी भाजपचे ग्रामपंचायत सदस्य श्रेया केसरकर, पदाधिकारी शैलेश केसरकर, राकेश केसरकर, सिद्धेश महाजन, मनोज कल्याणकर, प्रवीण नाटेकर, सुनील धामापूरकर, सागर तेली, अनिकेत धोंगडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!