-6.2 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा ग्रामीण भागात झंझावाती दौरा

कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात झंझावाती दौरा केला. नांदगाव, तळेरे, खारेपाटण, येथे गावोगावी भेट दिल्या आणि बैठका घेतल्या.

यावेळी तालुका अध्यक्ष राजू पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर ,शहराध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा सचिव सतीश पाताडे, कणकवली तालुक्याचे उपाध्यक्ष राजू पिसे भाई डांबे,जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, केदार खोत, भाजप अल्पसंख्याक मंडळ अध्यक्ष रजाक बटवाले, नांदगाव मुस्लिम ट्रस्ट अध्यक्ष अहमद बटवाले, माजी सभापती दिलीप तळेकर, माजी जि. प. सदस्य बाळा जठार, खारेपाटण ग्रा. पं. सदस्य सुधाकर ढेकणे, माजी सरपंच लियाकत काझी, रमाकांत राऊत, वासिम मुकादम, परवेज पटेल, शमशुदिन काझी, अकबर नेर्ले ,फारुख याहू, इस्माईल मुकादम आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!