24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचा झंझावात सुरू | महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली | मयुर ठाकूर : सध्या महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सध्या गावा गावांमध्ये प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. थेट गावागावातील प्रत्येक महिला वर्गापर्यंत पोहोचून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशासाठी काय केले तसेच केंद्रित मंत्री ना. नारायण राणे यांनी कोकणच्या जनतेसाठी काय केले. याचे महत्व पटवून देत ना. नारायण राणे यांचा प्रचार करत आहेत. त्यांना यादरम्यान प्रचारावेळी गावा गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे.

शनिवारी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर करंजे रोहीदासनगर मतदार संघात विविध भागात जाऊन महिलांना भेट देऊन भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कमळ या निशाणी समोरील बटण दाबुन मतदान करण्याबरोबर महिलांच्या विविध समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले.

यावेळी करंजे गावचे सरपंच सपना मेस्त्री, माजी सरपंच मंगेश तळगांवकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन करंजेकर, दारिस्ते सदस्य लता मेस्त्री, सांगवे माजी सरपंच  मयुरी मुंज, माजी सदस्या मिनल पवार, व महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!