सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : महाराष्ट्रासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सूरु आहे. यामध्ये सगळ्यात मोठ्यात संपूर्ण महाराष्ट्रासह देशात सिंधुदुर्ग – रत्नागिरी चा महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघ चर्चेत राहिला होता. केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांचं नाव अखेर रत्नागिरी – सिंधुदुर्ग साज लोकसभेचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल. त्यानंतर रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वर्तुळातून सत्ताधारी – विरोधकांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले. अनेकांवर वेगवेगळे आरोप होऊ लागले आणि मुद्दा येऊन थांबला तो सध्याचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उबाठा सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग च्या विकासासाठी काय केलं यावर ? तर सध्या राणे आणि राऊत यांच्याकडून काही वेळा वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून उत्तराला प्रत्युत्तर केले जात आहे. मात्र काही वेळा ना. नारायण राणे यांनी खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना टाळत असल्याचं दिसून येत. मात्र अस असलं तरी त विनायक राऊत यांचे आत त्यांच्याच गावातील विकासाबद्दल लोकांनी पोस्ट केलेल्या फोटो व कमेंट या निवडणूक पार्श्वभूमीवर चर्चेला विषय बनत आहेत. मात्र आता पाहिलं तर सामान्य माणूस देखील खा. विनायक राऊत यांनी नक्की कोकण विकासासाठी ? सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नक्की काय केलं ? असा सवाल उपस्थित करू लागले आहेत. सध्या खा. विनायक राऊत यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये खा. विनायक राऊत आपल्या गावतील शाळेत जाऊन मतदान करत आहेत आणि त्यापुढे लोकांनी कमेंट केल्या आहेत की, स्वतःच्या गावातील शाळेची भिंत रिपेअर करू शकले नाही हे काय ‘मतदारसंघाचा विकास करणार….” त्यामुळे सोशल मीडियावर ही पोस्ट आता जबरदस्त व्हायरल होत आहे.