कणकवली | मयुर ठाकूर : मुंबई – गोवा महामार्गावर साळीस्ते येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनर ला मागून येणाऱ्या ईर्टिगा कारने जोरदार धडक दिली. हा अपघात शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात ईर्टिगा कार चालक निखिल राजेंद्र गुंड ( रा. पुणे ) हा किरकोळ जखमी झाला आहे. तर सह प्रवासी देवा रेडीयार ( रा. पुणे ) हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची फिर्याद कंटेनर चालकाने कणकवली पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास कासार्डे पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत. दरम्यान अपघातातील जखमींना कणकवली शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताबाबत सविस्तर माहिती :
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी फाटयानजीक पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी मारूती इर्टीका कार चालकाचा ताबा सुटून मालवाहू ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात घडला.या अपघातात कार मधील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कारच्या पुढील भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर अपघात शनिवारी ८:३० च्या सुमारास घडला.
या अपघाताची सविस्तर माहिती अशी की, पुणेवरुन आपल्या ताब्यातील इंर्टीका कार घेऊन चालक निखल गुंड(वय- ३०, रा.पुणे )व सहप्रवाशी देवा रेडियार(वय ३०,रा.पुणे) हे सावंतवाडीच्या दिशेने जात असताना तरेळे वाघाचीवाडी फाटा नजीक आले असता चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार सरळ बाजूला असणा-या माहवाहू ट्रकवर जाऊन मागच्या लोखंडी बंपरवर आदळत अपघात घडला.अपघानतंर दोनही एयर बॅग खुल्या झाल्याने ही धडक जोरदार झाल्याचे स्थानिकांकडून समजते.
धडकेनंतर चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेले देवा रेडियार यांना या अपघातादरम्यान डोक्याला गंभीर दुखापत होत मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत कासार्डे येथिल १०८ रुग्णवाहीकेस संपर्क केला असता चालक रुपेश राणे,डॉ.अनिरुध्द मुद्राळे यानी तातडीने दाखल होत प्राथमिक उपचार करत रुग्णवाहीकेने कणकवली येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यानतंर दुखापत गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करत त्याच्यावर अधिक उपचार सुरु आहेत.या अपघातात चालकास कोणतीही दुखापत झाली नसून कारचे पुढील भागाचे नुकसान झाले आहे.सध्या उन्हाळी सुटटी असल्याने मोठया प्रमाणात मुंबईकर चाकरमानी व पर्यटक जिल्हात दाखल झाले वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.गेल्या दोन दिवसांतील महामार्गावरील हा दुसरा अपघात आहे.