कणकवली : शहराजवळ हळवल गावात असलेले रेल्वे फाटक काही ना काही घटनांनी नेहेमीच चर्चेत असते. शनिवारी सायंकाळी मुंबई च्या दिशेने जाणारी तेजस एक्सप्रेस हळवल रेल्वे फाटकावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. यावेळी रेल्वे फाटकवर वाहनांच्या मोठ्यात मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर त्या ठिकाणी फाटक उघडण्याची प्रतीक्षा करत असलेल्या व्यक्तींमधून या घटनेला साधारणपणे अर्धा तास पंधरा मिनिटे झाली असल्याची माहिती मिळाली.
यावेळी रेल्वे पोलीस देखील हळवल रेल्वे फाटकावर दाखल झाले होते. यावेळी हळवल रेल्वे फाटक येथे दाखल झालेल्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की सिग्नलच्या तांत्रिक बिघाडामुळे हा सगळा गोंधळ उडाला. मात्र हे कोणी केलेले नसून ते तांत्रिक पद्धतीने बिघडले असल्याचे सांगितले. त्यांनतर काही वेळात दिवा रेल्वे ही मडगाव च्या दिशेने रवाना झाली व त्यानंतर येथील रेल्वे गेट उघडण्यात आला.