कणकवली : एनआरएचएम कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. त्याच पद्धतीने सिंधुदुर्गातील डी. एड. बेरोजगारांच्या प्रश्नांची आपणाला पुर्ण कल्पना आहे. आपणाला न्याय देण्याचे काम निश्चितपणे केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले. यावेळी डी. एङ बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पाठींबाही जाहिर केला.
डी. एङ बेरोजगार संघर्ष समितीच्यावतीने महायुतीचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेण्यात आले. यावेळी यावेळी डी. एङ बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विजय फाले व समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. राणे यांनी मार्गदर्शन करताना आपला संघर्ष मला माहित आहे. आपण नेहमीच तुमच्यासोबत राहिलो आहे. जिल्हावासीयांच्या प्रत्येक समस्येची तड लावण्यासाठी आपला प्रयत्न असतो. एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्याबाबत भरतीमध्ये त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही केले. डी एङ बेरोजगारांच्या बाबतीतही आपण राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चित न्याय मिळवून देऊ, असे सांगितले.