10.5 C
New York
Friday, November 8, 2024

Buy now

महामार्गावर नांदगाव येथे कारला अपघात | मालवणला जाणारे तिघे पर्यटक जखमी

कणकवली : मुंबईहून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी ( क्रमांक – एमएच ०४ केडी ५३३४ ) चा टायर फुटल्याने चारचाकी पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात बेळणे येथे दुपारी ३.३० वा. च्या सुमारास मुंबई गोवा – महामार्गावर झाला.

मुंबई येथील कुटुंबीय आपल्या ताब्यातील चारचाकी घेऊन मालवणच्या दिशेने जात होते. त्यादरम्यान ती चारचाकी बेळणे येथे आली असता, अचानक चारचाकीचा टायर फुटला. त्यामुळे चारचाकी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी महामार्ग लगत पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी चारचाकीमधील अपघातग्रस्तांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना किरकोळ दुखापत झाली असून चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!