-10.2 C
New York
Tuesday, January 21, 2025

Buy now

नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडलं | तरुण पोलिसांच्या ताब्यात

नांदेड : देशासहित राज्यातील काही लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु आहे. राज्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातही मतदान सुरु आहे. कडक उन्हातही शेकडो लोक मतदान केंद्रात पोहोचून मतदानाचा अधिकार बजावत आहे. या मतदानादरम्यान राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर आता नांदेड लोकसभा मतदारसंघातील एका केंद्रात तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली.

नांदेडमधील तरुणाने ईव्हीएम मशीन फोडलं. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली. या तरुणाने छोट्या कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडले. भय्यासाहेब एडके असे तरुणाचे नाव आहे. यानंतर मतदान केंद्रावरील पोलिसांनी या तरुणाला तातडीने ताब्यात घेतले. या तरुणाने असे कृत्य का केले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!