आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश
कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते सदानंद मोरे,शिवराम मोरे,गणेश मोरे,प्रमोद मोरे,प्रभाकर देसाई,विनोद देसाई,प्रथमेश देसाई,अतुल मोरे,रवी बंटीवरडार,रदीर बेनेटी,परशुराम मोरे,विलास राणे,स्वप्निल राणे,उषा देसाई,प्रतिक्षा देसाई,प्रमिला देसाई,जानवी मोरे,दिशा मोरे,सुहासिनी मोरे ,महेश वारंग,आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ओसरगाव गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन व कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला.
उपस्थित आमदार नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत,मिलिंद मेस्त्री, राहुल आंगणे सुदर्शन नाईक आदि भाजप उपस्थित होते..