13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

मृतदेहाची ओळख पटली | तो मृतदेह सालईवाडा येथील तरुणाचा

सावंतवाडी ( प्रतिनिधी ) : येथील मोती तलावात आढळलेला तरुण हा सालईवाडा येथील इस्त्री व्यावसायिक असल्याचे पुढे आले आहे. महेंद्र मधुकर मोरजकर (वय ४२, रा. माजगाव-मेटवाडा) असे त्याचे नाव आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तलावात असलेला त्याचा मृतदेह बाहेर काढला. तलावाच्या काठावर बसलेला असताना तोल जाऊन तो पडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील मोती तलावात राजवाड्याच्या समोर असलेल्या भागात या तरुणाचा मृतदेह उलट्या स्थितीत आढळून आला होता. त्यामुळे तो नेमका कोणाचा मृतदेह याबाबत अधिक माहिती मिळू शकली नव्हती. दरम्यान नागरिकांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर तो मृतदेह सालईवाडा येथील इस्त्री व्यवसाय करणाऱ्या महेंद्र या तरुणाचा असल्याचे उघड झाले.

महेंद्र यांचा सालईवाडा जगन्नाथराव भोसले शाळेनजिक वडिलोपार्जित लाँडी व्यवसाय आहे. दोन्ही बंधु महेंद्र व जितेंद्र हा लाँडी व्यवसाय सांभाळत यापूर्वी त्यांचे वडील मधुकर मोरजकर ह्या व्यवसायात होते. वयोमानानुसार त्यांनी व्यवसायाची धुरा दोन्ही मुलांनकडे सोपवले होते. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी माहिती दिली. तसेच त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटीर रूग्णालयात नेण्यात आला. महेंद्र याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. अभिनव फाउंडेशनचे पदाधिकारी जितू मोरजकर यांचे ते बंधु होत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!