सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले काजूला दर नाही परदेशातील काजू आणून स्थानिक शेतकऱ्यांना मारायचे काम या सरकारने केले परदेशातील काजूवर 20 टक्के आयात कर लावण्यासाठी मागणी करणारा एकमेव खासदार विनायक राऊत यांची ओळख आहे. दहशतवादाशिवाय नारायण राणेंनी या जिल्ह्यात काय केले याचा प्रश्न त्यांना तुम्ही विचारा प्रकल्पाच्या नावावर हजार एकर जमिनी बाळकावली भागीदारीमुळे सिंधुदुर्ग एअरपोर्ट रखडला आता आम्ही कारभार सुरळीत करणार असा विश्वास खासदार राऊत यांनी कार्यकर्त्यांना दिला.
भाजपा कपटी पार्टी असून समा समाजातील तेढ निर्माण करण्याचे काम या भाजपने केली मुंबई गुजरातला जोडण्यासाठी शिवसेना फोडली या दृष्ट भावनेने ज्यांनी काम केले ते नरकात जातील असा विश्वास प्रचार सभेत खासदार विनायक राव यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यी प्रचार सभा वैभववाडी येथे पार पडली.
यावेळी शिवसेनेचे उपनेते संजना घाडी, युवा सेनेचे वरून सरदेसाई, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, मुंबई नगरसेवक रमाकांत रहाटे संजय घाडी, युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत शिवसेना नेते अतुल रावराणे जिल्हाप्रमुख संदेश पारकर तालुकाप्रमुख मंगेश लोके तालुका सरचिटणीस स्वप्निल धुरी माजी उपनगराध्यक्ष संपदा राणे महिला शहर प्रमुख मानसी सावंत काँग्रेसच्या जिल्हा सचिव तथा माझी सभापती मीनाताई बोडके, आ प चे जिल्हाध्यक्ष ताम्हणकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील नलिनी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पल्लवी झिमाळ नगरसेवक मनोज सावंत रोहित पावसकर आधी शिवसैनिक महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा सेनेचे वरून सरदसाई म्हणाले कोकणाचा शाश्वत विकास करायचा असेल तर राजकीय दहशतवाद संपायला हवा कोकणातील माणूस आता इर्षाने पेटला आहे नारायण राणे यांना आता हद्दपार करण्याची हीच वेळ आहे हा निर्णय आता कोकणी जनतेने घ्यायचा आहे. आता जनतेने ठरवलं आहे खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा जिंकवायचे आहे मताधिक्य कोण जास्त देतो ते पाहूया मताधिकेसाठी स्पर्धा करूया असे आव्हान युवा सेनेचे वरून सरदेसाई यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव त्यांच्या वैभववाडी येथील प्रचार सभेत केली.
यावेळी शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत जिल्हा प्रमुख संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत शिवसेनेचे उपनेते संजना घाडी नगरसेवक रमाकांत रहाटे अतुल रावराणे मीनाताई बोडके, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले







                                    