13.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

माऊली मित्रमंडळाचे कौतुकास्पद काम | पाण्याची व धान्याची सोय करून भूतदया जोपासली

सिंधुदुर्ग : कडक उन्हाळ्यामुळे पशू-पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पशू-पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी माऊली मित्रमंडळाने जुना भाजी मार्केट व पटकीदेवी मंदिर परिसरात पाण्याची व धान्याची सोय करून भूतदया जोपासली.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, ग्राहक पंचायत जिल्हा संघटक दादा कुडतरकर, साजिद कुडाळकर, सुभाष उबाळे, अविनाश गावडे ,प्रभाकर कदम, भगवान कासले, बाबुराव घाडीगावकर, प्रदीप कुमार जाधव, प्रसाद उगवेकर, विशाल राजपूत , लक्ष्मणराव महाडिक यांच्यासह पटकीदेवी मित्रमंडळाचे विवेक मुंज, दीपक डगरे, तन्मय उबाळे, विलास चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र पेडणेकर, दादा कुडतरकर, साजिद कुडाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!