26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

विजेचा शॉक | लाईनमनचा मृत्यू

डिचोली : येथे लाईटच्या पोलावर दुरुस्तीसाठी चढलेल्या लाईनमनला विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मनोज वामन जांबावलीकर ( वय ३४ ) असे त्याचे नाव आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले होते. जोपर्यंत वीज अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

येथील एका फिटनेस सेंटर मध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याची तक्रार आल्याने मनोज जांबावलीकर हे दुरुस्तीसाठी लाईटच्या पोलावर चढले होते. त्यावेळी विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक मनोज जांबावलीकर यांना विजेचा धक्का बसून ते खांबावरच मयत झाले.

दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व डिचोली पोलीस दाखल झाले. त्यांनी पोलावरील मृतदेह खाली उतरवला. मयत मनोज जांबावलीकर हे पिळगाव – गावकरवाडा येथील रहिवासी असून दोन वर्षांपूर्वीच ते लाईनमन म्हणून रुजू झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!