21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

अज्ञात मोटरसायकलच्या धडकेने एक जखमी ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कणकवली : वागदे ग्रामपंचायत येथून चालत तेथील बसथांबा येथे जाणाऱ्या पादचाऱ्याला गोव्याहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात मोटरसायकलने धडक देऊन पळून गेला. यात पादचारीस कानोजी रूकमाजी गुराम (५५, रा. वागदे सावरवाडी) हे जखमी झाले. कानोजी गुराम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मोटरसायकल स्वारावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास झाला. कानोजी गुराम हे वागदे ग्रामपंचायत येथील मुंबई गोवा महामार्ग ओलांडून तेथील बस थांब्याजवळ चालत जात होते. त्या दरम्यान गोव्याकडून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात मोटरसायकलने त्यांना पाठीमागून धडक देऊन न थांबता पळून गेला. त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी कानोजी गुराम यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात कानोजी गुराम यांना डाव्या हाताला किरकोळ दुखापत तर डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!