कणकवली : रेल्वे तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी रुपेश तुकाराम पाटकर (३३, रा. आचरा वरचीवाडी) रेल्वे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी कणकवली शहरातील एकाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर गुरुवारी आचरा वरचीवाडी येथील रुपेश पाटकर यांच्यावर रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. यात काळाबाजार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य रेल्वे पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक राजेश सुरवाडे, कॉन्स्टेबल विनोद पाटील, युवराज पाटील, विपुल म्हैस्के यांनी केली.