कणकवली | मयुर ठाकूर : भाजप ची १३ वी यादी जाहीर झाली आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर जाहीर केली आहे.
गेले खूप दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहणारे याबाबत उलट सुलट चर्चा होत होत्या त्याला पूर्ण विराम मिळाला आहे.
मागील कित्येक दिवस केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारी बाबत प्रश्नचिन्ह राहिले होते. मात्र आज महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र येत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी ही जाहीर केली आहे. त्याचबरोबर कणकवली शहरात कणकवली पटवर्धन चौक येथे जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगरसेविका मेघा गांगण, स्वनिल चिंदरकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, बंडू गांगण, विठ्ठल देसाई, प्रज्वल वर्दम, जिल्हा बँक संचालक अण्णा कोदे, निखिल आचरेकर आदी उपस्थित होते.