19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

पत्रादेवी चेक नाक्यावर पर्यटकांच्या कारला अपघात | एक ठार

सात जण जखमी ; दोघांची प्रकृती चिंताजनक

अपघात होऊन अर्धा तास झाला ; मात्र एक्साइज, आरटीओच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्यच नाही

बांदा : गोव्यातून लातूरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला पत्रादेवी चेक नाक्यावर अपघात झाला. उभ्या ट्रक ला कार चालकाने मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात एक इसम ठार झाला, असून एका पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच पाच लहान मुले गंभीर जखमी झाली. पैकी दोन लहान मुलांना तातडीने गोवा – बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

अपघातात कार चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्यालाही उपचारासाठी गोवा – बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर एका गंभीर जखमी महिलेला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा – बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ७:४५ वा. च्या. सुमारास घडला. कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.

 अपघात होऊन अर्धा तास झाला ; मात्र एक्साइज, आरटीओच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्यच नाही

अपघातानंतर सर्व जखमी तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ गाडीत अडकून पडले होते. पत्रादेवी चेक नाक्यावर अपघात होऊनही एक्साइज, आरटीओच्या कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळी कोणत्याही प्रकारचे मदतकार्य न केल्याने स्थानिक संतप्त झाले. पोलीस घटनास्थळी झाल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्यास सहभाग घेतला. जखमींना गाडीतून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून गोवा – बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. जखमींची नावे मिळू शकली नाही. मात्र यामधील एका इसमाची प्रकृती चिंताजनक आहे.q

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!