14.9 C
New York
Sunday, June 1, 2025

Buy now

मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी ज्येष्ठाचा मृत्यू

कणकवली : मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात सूर्यकांत सखाराम म्हसकर ( वय ७३, रा. साकेडी-वरचीवाडी) हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यानंतर त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सूर्यकांत म्हसकर हे सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरामागील असलेल्या ब्राह्मण देवस्थानच्या ठिकाणी दिवा लावण्यासाठी गेले होते. त्यावेळी मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. य्त्यानंतर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंतजनक बनल्याने त्यांना नातेवाईकांनी सोमवारी रात्री कणकवली खासगी रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत रवींद्र सहदेव कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्युची नोंद झाला आहे. सूर्यकांत म्हसकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!