कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या २००१ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. २००१ च्या बॅचचे विद्यार्थी तब्बल २४ वर्षांनी एकत्र आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात जमले. या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यासाठी गुरुजनांना आमंत्रित केले होते. शालेय जीवनातील आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. माजी शिक्षक डी.पी.तानवडे, जगदिश कांबळी, श्री. गुरव, शिक्षिका श्रद्धा कदम, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी . जे प्रसाद राणे. जे.जे. शेळके, श्रीमती कुबल, श्रीमती सुखी, वंदना तांबे, आर.आर.कदम यांना आंमत्रित केले होते. गाप्पा गोष्टी मारताना विद्यार्थी काही काळ बालपणात हरवून गेले. त्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेविषयी असलेले प्रेम व्यक्त केले. शिक्षकांमुळे आम्ही संस्कारक्षम झालो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. निलेश उर्फ मुन्ना वाळके व निलेश राणे यांच्यासह विद्यार्थ्यांनी विद्यामंदिर प्रशालेच्या विकासासाठी मदत करण्याचेही आश्वासन दिले. माजी विद्यार्थ्यांच्या हातून शाळेच्या प्रगतीत हातभार लागावा, अशी अपेक्षा पी. जे. कांबळे यांनी व्यक्त केली.