15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

भाजी – फळ वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात | टेम्पो थेट शेडमध्ये शिरला

सावंतवाडी | बांदा : झोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून भाजी व फळांची वाहतूक करणारा टेम्पो थेट इन्सुली येथे रस्त्यालगतच्या शेड मध्ये पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सुदैवाने या अपघातात चालकाला दुखापत झाली नाही. हा अपघात आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली चर्च समोर झाला.

याबाबतची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते विकी केरकर यांनी दिली. अपघातग्रस्त टेम्पो चालक कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने भाजी व फळांची वाहतूक करत होता. इन्सुली चर्च समोर जोसेफ होलिक्रोस गॅरेजची शेड आहे. चालकाला झोप अनावर झाल्याने टेम्पोची शेडला जोरदार धडक बसली. या धडकेत टेम्पो पलटी झाल्याने शेड पूर्णपणे कोसळली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!