28.9 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

प्रवाशाच्या बॅगेत सहा जीवंत काडतुसे | प्रवासी मुंबईतील ; मोपा पोलिसांनी घेतले ताब्यात

सिंधुदुर्ग : उत्तर गोव्यातील मोपा (ता. पेडणे) येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल रविवारी मुंबईतील गौरव उदय दळवी या प्रवाशाच्या बॅगेत सहा जीवंत काडतुसे सापडली. याप्रकरणी गौरवला मोपा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल दुपारी मोपा विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या गौरवच्या बॅगेचे ‘स्क्रिनिंग’ केले असता त्याच्या बॅगेत जिवंत काडतुसे असल्याचे स्पष्ट झाले. त्याला तात्काळ विमानतळवरील सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले.

मोपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती वकील असून त्याच्या वडिलांकडे पिस्तूल वापरण्याचा परवाना आहे. मुंबईहून विमानाने येताना त्याने चुकून ही बॅग आणली होती. वांद्रे (पूर्व) येथील रहिवासी असणारे उदय दळवी गोव्यातून मुंबईला जात होते. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांची बॅग तपासण्यात आली असता, त्यात सहा जीवंत काडतुसे सापडली.  दळवी यांच्याकडे काडतुसांचा वैध शस्त्र परवाना नसल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोपा पोलिस उपनिरीक्षक दीपळ हळर्णकर अधिक तपास करीत आहेत

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!