30.4 C
New York
Thursday, June 19, 2025

Buy now

दुचाकी अपघात | महिलेचा मृत्यू ; सावरवाड येथील घटना

सिंधुदुर्ग : मालवण कसाल मार्गांवरील सावरवाड थिठा परिसरात दुचाकी खड्ड्यात गेल्याले झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या गीता उमेश हिर्लेकर (वय ५०) रा. वराड घाडेवळवाडी या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या गीता हिर्लेकर यांचा सोमवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यू नंतर परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गीता हिर्लेकर या त्यांच्या नातेवाईक यांच्या दुचाकीवरून कसालच्या दिशेन जात असताना हा अपघात घडला. गीता यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!