सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील जीर्ण झालेले विद्युत लोखंडी पोलांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्वरित बदलण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सौ अर्चना घारे परब यांनी आज येथे निवेदनद्वारे केली.
दरम्यान पावसाळा तोंडावर आल्याने शहरात अनेक ठिकाणी पोल हे जीर्ण झाले आहे.तसेच विजेचा खांबावर झाडाच्या फांदी देखील आल्या आहेत त्यामुळे ते देखील तात्काळ तोडून पावसाच्या पूर्वी हे सर्व कामे मार्गी लावावी अशी मागणी देखील सौ. घारे यांनी यावेळी केली आहे.
यावेळी अर्चना घारे परब पुढे बोलताना म्हणाले की आज माझगाव येथे घडलेली ही घटना ही दुर्देवी असून सुदैवाने त्या युवकाला कोणती दुखापत झाली नाही त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी आपण त्वरित याची दखल घेऊन तालुक्यातील जीर्ण झालेल्या लोखंडी खांब पावसाळ्यापूर्वी बदलण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी निवेदनद्वारे केली आहे