माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली : आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी कणकवली तेली आळी येथील भवानी सभागृहात मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. श्री परशुराम उपरकर मित्र मंडळ आणि शिवसेना कणकवली यांच्या वतीने आयोजित केलेल्या या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी 200 जणांना चष्मे वाटप करण्यात आले.तर नेत्र तपासणी शिबिरामध्ये 10 जणांना मोतीबिंदू असल्याचे तपासणीत आढळून आले.या 10 जणांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मुंबई येथे मोफत केले जाणार आहे.कणकवली तालुक्यातून आलेल्या लाभार्थ्यांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.आणि समाधान व्यक्त केले यावेळी 200 लाभार्थ्यांना 70 रुपयांमध्ये चष्मे वाटप करण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत,माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिबिराच्या ठिकाणी भेट दिली.
यावेळी चंद्रशेखर उपरकर, मंगेश लोके ,राजू शेट्टी, भालचंद्र दळवी ,राजू कोरगावकर, निलेश चव्हाण, अजित काणेकर,संतोष सावंत, समीर परब , अभि तेंडुलकर, संजय बेलवलकर, संदीप म्हाडगुत, किरण हुंनरे, गिरीश उपरकर, प्रशांत उपरकर, प्रणव उपरकर, शैलेश नेरकर, वैभव काणेकर ,गणेश पारकर, बंटी तहसीलदार ,राजू कोरगावकर ,पप्पू कोरगावकर ,सुहास सांडव ,हेमंत उपरकर, प्रवीण कोरगावकर, अनिल राणे , टिकू कांबळी,सुनील राणे यांच्यासह करमार सिंह हॉस्पिटल मुंबई अंधेरी पश्चिम, एमजेएफ लायन डॉ. आर. जी. राव, डॉ. नीलम बांदिवडेकर ,डॉ. मिलन जगदीश राव, डॉ. सैफ मोहम्मद, डॉ. दानिश आदी उपस्थित होते.
यावेळी परशुराम उपरकर म्हणाले की,वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य म्हणून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य शिबिरे आणि मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेऊन ७० रुपयांमध्ये चष्मे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासत आहोत.गोर गरीब लोकांना महागाईची झळ बसत आहे.त्यामुळे सध्याच्या महागाईत ७० रुपयांत चष्मा वाटप केले आहे.आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत श्री .परशुराम उपरकर मित्र मंडळ आणि शिवसेना कणकवली यांच्या वतीने तसेच गाबित समाज देवगडच्या वतीने जिल्हाभरात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. करमार सिंह हॉस्पिटल मुंबई अंधेरी पश्चिम, एमजेएफ लायन डॉक्टर आर जी राव यांच्या माध्यमातून मोतीबिंदू तपासणी करून ऑपरेशन मुंबई येथे मोफत केले जाणार आहे.असेही उपरकर यांनी सांगितले