कणकवली : “राणे साहेबांना शिव्या देणारे, खालच्या पातळीवर टीका करणारे आता भाजपा प्रवेशा साठी निर्लज्जपणे लाचार होऊन लाचारी करत आहेत….. समझनेवालों को इशारा काफी है!” अशा आशयाचा व्हाट्सअप स्टेटस आहे कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा!
सकाळपासूनच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या व्हाट्सअपला स्टेटस ठेवला. मात्र तो स्टेट्स भविष्यातील राजकीय घडामोडींचा “संदेश” देणारा ठरणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचा एक “युवा नेता” भाजप पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अशी चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलीच जोर धरू लागली आहे. आता मात्र या स्टेटसमुळे दुजोरा मिळू लागला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार पडत असताना आता भाजपच्या जिल्हा कार्यकारणी मध्ये असलेल्या माजी नगराध्यक्ष समीरला नलावडे यांनी लावलेला हा व्हाट्सअप स्टेटस हा चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत समीर नलावडे यांचे समजणे वालों को इशारा काफी है! हे शेवटचे वाक्य हे भविष्यातील राजकीय घडामोडींचा “संदेश” देणारे ठरणार आहे. त्यामुळे आता याबाबत काय घडामोडी घडतात ते पाहणे महत्त्वाचे औत्सुक्याचे ठरणार आहे.