अभिनेत्री अमृता राव, सीईओ साबे यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण
कणकवली : कणकवली शहरातील इंजिनिअर प्रतीक खंडेराव कोतवाल यांना स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया प्राईम टायकून मीडिया व टेक एलएलपी यांच्या वतीने बेस्ट कस्टमर सर्व्हिस अवॉर्ड इन मल्टी सर्व्हिसेस पुरस्कार पणजी गोवा येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आणि
स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाचे सीईओ निलेश साबे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया प्राईम टायकून मीडिया व टेक एलएलपी यांच्या वतीने
भारत बिजनेस अचीवर्स अवॉर्ड 2025 जाहीर करण्यात आले होते. त्याचे वितरण पणजी येथे समारंभपूर्वक करण्यात आले.
प्रतीक कोतवाल गेली तीन वर्ष टाटा हेल्थ अँड ट्रॅव्हल इन्शुरन्स ॲडव्हायझर म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर कोकण मल्टी सर्विसेस अंतर्गत ई सेवा रेल्वे तिकीट फ्लाईट तिकीट तसेच ट्रॅव्हल्स अँड टूर्स सेवा ही देत आहेत
यापूर्वी त्यांना स्टार्ट अप इंडिया अंतर्गत महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसेच टाटा कंपनीमार्फत बेस्ट अचिव्हमेंट अवॉर्ड 2024 प्राप्त झाला आहे या यशाचे श्रेय ते आपले वडील कै. प्राध्यापक खंडेराव कोतवाल यांना देतात. मेकॅनिकल इंजिनिअर असूनही प्रतीक यांची सेवा व्यवसाय क्षेत्रात येण्याची इच्छा व क्षमता ओळखून कै.प्रा.कोतवाल यांनी प्रतीक ला यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. वडिलांच्या पाठिंब्यामुळे मी हे यश मिळवू शकलो म्हणून हा पुरस्कार मी माझ्या वडिलांना समर्पित करीत आहे असे प्रतीक कोतवाल यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले प्रतीक यांनी अल्पावधीतच मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.