कणकवली : सख्ख्या भावाला बांबूच्या दांड्याने मारहाण केल्याबद्दल रिचर्ड इत्रु फर्नांडिस (वय ३०, रा. सांगवे, घोसाळवाडी) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात बी एन एस ११८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जॉन्सन इत्रु फर्नांडिस याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रिचर्ड व फिर्यादी हे सख्खे भाऊ असून अविवाहित असून एकाच घरात विभक्त राहतात. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता रिचर्ड व जॉन्सन एकमेकांशी बोलत असताना रिचर्ड याला राग आला आणि त्याने बांबू च्या दांड्याने जॉन्सन याला मारहाण केली. अधिक तपास पोलिस नाईक दिगंबर घाडीगावकर करत आहेत.