5.5 C
New York
Thursday, March 13, 2025

Buy now

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस केले अभिवादन

कणकवली बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण केला पुष्पहार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर देश प्रगतीकडे चालला आहे

कणकवली | मयुर ठाकूर : स्वातंत्रता, समता व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारे, समाजसुधारणेचे अग्रणी, अर्थतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली बस स्थानक नजीक असलेल्या बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून पवित्र स्मृतीस भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अभिवादन केले.देशाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्याच संविधानाच्या आधारावर देश प्रगतीकडे मार्गक्रमण करत आहे. अशा शब्दात अभिवादन केले.


यावेळी आमदार नितेश राणे , माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे,संजय कदम,नंदू पवार,गोठोस्कर,सुनील तांबे,किरण जाधव ,कमलेश नरे,मालोजी कोकरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!