वेंगुर्ला : वेताळ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कै.गुरूदास तिरोडकर यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ९० जणांनी रक्तदान करून गुरूदास यांना श्रद्धांजली अर्पण केली. या शिबिराचे उद्घाटन झांटये काजू उद्योग समूहाचे स्वप्निल झांटये व ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रश्मी परब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी प्राचार्य आनंद बांदेकर, उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, नारायण कोचरेकर, स्वाती सावंत, मयुरी बरागडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद तांडेल, नारायण नागवेकर, मारूती दोडशानट्टी, सुजाता पडवळ, किशोर तेंडोलकर, वामन तुळसकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आदी उपस्थित होते. वृंदा कांबळी यांसह अनेक मान्यवरांनी गुरूदास तिरोडकरच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तर प्रतिष्ठानच्या रूग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजूंना मोलाची मदत होत असल्याबाबत आनंद बांदेकर यांनी तर प्रतिष्ठानच्या रक्तदान चळवळीविषयी स्वप्निल झांटये यांनी गौरवोद्गार काढले. सर्व रक्तदात्यांचा झांटये काजू आणि सामाजिक कार्यकर्ते विकास घारे यांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या शिबिरासाठी सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ, आनंदयात्री वाङ्मय मंडळ, शारदा प्रतिष्ठान रामघाट, बालगोवर्धन कला क्रीडा मंडळ, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आदींनी सहयोग संस्था म्हणून तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश राऊळ, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, किरण राऊळ, सचिन राऊळ, प्रसाद भणगे, प्रदीप परुळकर, सागर सावंत, प्रतीक परुळकर, प्रज्वल परूळकर, यशवंत राऊळ, जान्हवी सावंत, भक्ती भणगे, हेमलता राऊळ, कुंदा सावंत, विधी नाईक, प्रमोद तांबोसकर, नाना राऊळ, बापू वेंगुर्लेकर, धीरज आळवे, शंकर देसाई, डॉ.जी.पी.धुरी, शिवानी परूळकर, सानिया वराडकर, रामचंद्र परूळकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी तर आभार माधव तुळसकर यांनी मानले. दरम्यान, चित्रकार वामन तुळसकर यांनी प्रतिष्ठानच्या मागील शिबिरात रक्तदान केलेल्या ६२ रक्तदात्यांचे स्केच रेखाटले होते. ते स्केच संबंधित रक्तदात्यांना देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. नाविप्यपूर्ण उपक्रमाबद्दल वामन तुळसकर यांचा स्मृतिचिन्ह व शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.