31.6 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे भविकांना मोफत सुविधा

मसूरे | झुंजार पेडणेकर : श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्न “श्री स्वामी समर्थ मठ- मसदे वडाचापाट या मठामध्ये 22 फेब्रुवारी रोजी
श्री भराडी देवी आंगणेवाडी या यात्रेला येणाऱ्या भाविक, भक्तांसाठी “श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास (रजि.)
या संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ मठामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत चहा नाष्ठा, दुपारी १२:३० ते ३ वा. पर्यंत जेवण (अन्नदान), सायं. ४ वा. पासून. चहा व अल्पआहार देण्यात येणार आहे.

तसेच यात्रा बंदोबस्त सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस, ट्रॉफीक पोलीस, एस. टी. वाहक, चालक, कर्मचारी व भाविक, भक्तगण यांची आंघोळी साठी गरम पाणी व बाथरूमची ही व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!