24.5 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

सिंधुदुर्ग जिल्हयात दिव्यांगांच्या उन्नतीसाठी शासन स्तरावर शिबीर आयोजित करा

पालकमंत्री ना. नितेश राणेंनी प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांकडून केली जातेय मागणी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिव्यांग असलेल्या व्यक्तींची मोठी संख्या आहे. अद्यापही काही व्यक्ती या शासनाच्या लाभांपासून दूर राहिलेले आहेत. शासनाचे असलेले अटी शर्तींचे नियम यामुळे दिव्यांग व्यक्ती अनेक शासकीय सवलतींपासून दूर आहेत. अनकेदा लक्षवेधी आंदोलन झाली, पत्रकार परिषदा झाल्या मात्र कोणीही गांभीर्याने घेतले नाही. नोकरीच्या दृष्टीने पाहिले तर पदवी, मेडिकल, इंजिनिअरिंग यासह अनेक शैक्षणीक क्षेत्रात शिक्षण घेतलेले दिव्यांग व्यक्ती आजच्या घडीला बेरोजगार होऊन बसलेले आहेत. अनेक लोकप्रतिनिधींशी चर्चा झाली मात्र या दिव्यांग व्यक्तींना न्याय काही मिळाला नाही.

त्यामुळे सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश येणे हे देऊ तो शब्द पूर्ण या वचनाने चालणारे म्हणून ओळखले जातात. याच पालकमत्र्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातीळ दिव्यांग व्यक्तींना काहीतरी न्याय मिळेल अशी आशा आहे. अनकेदा बरेच दिव्यांग व्यक्ती देखील केलं तर ते फक्त नितेश राणेंनी नाहीतर काही शक्य असे बोलतात. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी काय भूमिका घेणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आजही कणकवली शासकीय विश्राम गृह याठिकाणी दिव्यांग व्यक्तींच्याबाबतीत प्रशासकीय बैठक होणार आहे या बैठकीत दिव्यांग हिताचा काही निर्णय होणार आहे का याकडे देखील दिव्यांग व्यक्ती नजरा लावून आहेत.

त्याचप्रमाणे शासन स्तरावरून दिव्यांग व्यक्तींना रोजगार निर्मिती, अटी शिथिल करून वैयक्तिक रोजगारासाठी कर्ज योजना, जास्तीत जास्त शिकलेल्या व्यक्तींना नोकरी, यासह अन्य काही दिव्यांग व्यक्तींच्या मागण्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करून त्यावर विचारविनिमय होणं गरजेचं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर अधिकारी देखील पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे बोट दाखवतात त्यामुळे आजच्या होणाऱ्या बैठकीनंतर पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना एकत्र करून काही उपाययोजना व असलेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी काय प्रयत्न करणार हे पाहावे लागणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!