15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

हळवल फाटा येथील त्या अपघाती वळणावर तात्काळ हायमास्ट बसवा | वाहनचालक व नागरिकांची मागणी

कणकवली | मयुर ठाकूर : शहरातील वागदे गडनदी हळवल फाटा येथील त्या तीव्र अपघाती वळणावर हायमास्ट बसवण्याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली होती. कारण याठिकाणी होणारे अपघात हे रात्र वेळी झालेले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा वाहनचालकांना देखील या वळणाचा अंदाज येत नाही. जर या वळणावर एखादा हायमास्ट बसवला असता तर निदान या वळणाचा अंदाज वाहनचालकांना येऊ शकेल. काही महिन्यांनापूर्वी जाणवली येथे मुंबई – गोवा महामार्गावर अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तेव्हा तेथील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. यावेळी प्रशासनच्या काही जबाबदार अधिकाऱ्यांना हळवल फाटा येथील वळणाबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला होता. यावेळी प्रशासनाच्या अधिकऱ्यांनी हळवल फाटा येथील वळणावर हायमास्ट मंजुर झाला असल्याचे सांगितले होते. मात्र ते खरे की खोटे हे त्याचं अधिकऱ्यांना माहिती ? मात्र गडनदी पुलावर झालेला अपघात देखील जीवघेणाच ठरला. त्यामुळे संबंधित प्रशासनाने अपघात ? नोंद ? कारवाई ? आणि कोणाचा तरी फोन गेल्यावर आर्थिक मदत असे न ठेवता येथील वळणक्बाबत ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. तसेच तात्काळ त्या ठिकाणी हायमास्ट बसवणे गरजेचे आहे. अशी मागणी वाहनचालक व नागरिक करत आहेत.

त्यामुळे प्रशासन आतातरी या मागणीला गांभीर्याने घेते की पुन्हा येरे माझ्या मागल्याच होतंय हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!