कणकवली ( मयुर ठाकूर ) : पोलीस ठाणे कणकवली येथे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक संजय दराडे यांनी गुरुवारी सायंकाळच्या वेळेत वार्षिक तपासणी निमित्त भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याची पहाणी केली. तसेच पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी त्यांच्यासमवेत सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उप. निरीक्षक अनिल हाडळ, राजकुमार मुंढे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक संजय दराडे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस दलातील वार्षिक तपासणी करण्यासाठी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेट देवुन अंमलदार, संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करत आहे. त्यांच्या कामाचा आढावा घेत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काम करताना काय अडचणी आहेत का ? त्याचा आढावा घेत आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना श्री. दराडे यांनी सिंधुदुर्ग पोलीस दलाचे कौतुक केले. ते म्हणाले, सिंधुदुर्ग पोलीसांची कामगिरी चांगली आहे. पोलीसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उलघडा व्हावा, असा आपला प्रयत्न आहे. शंभर टक्के गुन्ह्यांचा छडा लागला पाहीजे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. पोलीस दलात चांगले जे काम आहेत त्यांना बक्षिस दिले जाईल, अशी प्रतिक्रिया कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरिक्षक संजय दराडे यांनी दिली.
वार्षिक तपासणीच्या निमित्ताने कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरिक्षक संजय दराडे यांनी गुरुवारी सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. तसेच गुन्ह्याच्या संदर्भात काही सुचना श्री. दराडे यांनी पोलीसांना दिल्या आहेत.