4.7 C
New York
Thursday, December 5, 2024

Buy now

मतदार संघातील सरपंचांना अधिकार वाणीने बोलण्याचा अधिकार आ. नितेश राणे यांनाच

वागदे सरपंच संदीप सावंत यांनी वैभव नाईक यांचा दावा खोडला

कणकवली | मयुर ठाकूर : गावचा सरपंच म्हणून गावविकासासाठी विकासनिधी मागितला की आमदार नितेश राणे कधीच आखडता हात घेत नाहीत. अपेक्षेपेक्षा जास्त विकासनिधी आमदार नितेश राणे यांच्याकडून सर्व सरपंचांना दिला जातो. त्यामुळे कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील भाजपाच्या सरपंचांकडे अधिकारवाणीने लोकसभेसाठी अपेक्षित लीड मागण्याचा हक्क नितेश राणे यांचा आहे.

मतदार संघातील सरपंचांना अधिकार वाणीने बोलण्याचा अधिकार आमदार नितेश राणे यांना आहे. तालुक्यातील कोणत्याही गावात विकास कामासाठी निधी हवा असल्यास सरपंच म्हणून आम्ही केव्हाही आमदार राणे यांच्याकडे गेल्यावर हवा असेल तेवढा निधी गावच्या विकास कामांना मिळतो.

त्यामुळे आम्ही सरपंच म्हणून निवडून येण्यात आमदार नितेश राणे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी सरपंच यांना दिलेली ती धमकी नसून केलेले आवाहन आहे. त्यामुळे याबाबत विनाकारणी जनतेमध्ये गैरसमत पसरवू नका. असे आवाहन वागदे सरपंच संदीप सावंत यांनी करत आमदार वैभव नाईक यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!