कणकवली | मयुर ठाकूर : नाटळ विभागातील मेळाव्याची गर्दी पाहून जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मेळावा गर्दीचा उच्चांक पाहून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी संदेश सावंत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. नाटळ,सांगवे विभाग 1990 पासून माझ्या कायम पाठीशी राहिला आहे. अब की बार चार सौ पार हे मोदींचे स्वप्न आहे. ह्या 400 खासदारांमध्ये आपल्या हक्काचा खासदार निवडून द्या. 1990 साली जील्हाचे 35 हजार असलेले दरडोई उत्पन्न 2 लाख 40 हजार झाले आहे. पंतप्रधान मोदींनी जनतेच्या भल्यासाठी 54 विकास योजना राबविल्या. गोरगरीब जनतेला 5 लाख पर्यंत चे मोफत औषधोपचार मिळावे यासाठी आयुष्यमान योजना सुरू केली. मोफत धान्य आणि शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठविले.2030 साली भारत जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता करण्याचे मोदी यांचे स्वप्न आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत नाटळ विभागातील महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा कनेडी सांगवे बाजारपेठ नजीक संपन्न झाला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. पुढे बोलताना मंत्री राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. दिल्लीत रामलीला मैदानावर जाऊन उद्धव ठाकरेंनी सत्तेत आल्यावर मोदींना तडीपार करण्याची भाषा केली. यांचे खासदार संख्या 5, भाजपाची 302. आणि भाषा करतात तडीपार करण्याची. कोव्हीड काळात 15 टक्के कमिशन घेऊन औषधांचे टेंडर उद्धव याने मॅनेज केले. शरद पवार यांनी देशात चांगले घडत असताना चांगले म्हणावे ही अपेक्षा आहे. राहुल गांधी बछडा आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी 54 खासदार लागतात. काँग्रेसचे केवळ 50 खासदार आहेत, तेही 4 जून ला कमी होतील.
मोदींची हुकूमशाही सुरू असल्याची आवई उठवत आहेत. काँग्रेस च्या एका खासदाराच्या घरात 350 कोटी रोकड सापडली, मग त्याला अटक करू नये ? संजय राऊतची मोदींवर बोलण्याची औकात आहे काय ? आमच्या महाराष्ट्ररात देशात मोदी शहांवर अपशब्द बोलाल तर आम्ही सहन करणार नाही असा इशाराच राणे यांनी दिला.
यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष संजना सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, भाजपा अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत, सांगवे संजय सावंत, सुरेश ढवळ, दारीसते उपसरपंच संजय सावंत, विजय बोभाटे आदी उपस्थित होते.