13.8 C
New York
Monday, April 21, 2025

Buy now

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा समोरील संविधान प्रतिकृती शिल्प विटंबना निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भाजप अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे व पोलीस अधीक्षकांकडे मागणी

सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी च्या वतीने . जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन चंद्रकांत जाधव जिल्हा चिटणीस भाजप सिंधुदुर्ग नामदेव जाधव अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली निवेदन देण्यात आले.डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृती शिल्पा विटंबना निषेधार्थ.. निवेदन देण्यात आले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेले संविधान प्रतिकृती शिल्प स्टँड वरून उखडून त्याची नासधूस करून विटंबना केल्याचा प्रकार घडला हा सामजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणीव पुर्वक केलेला प्रयत्न आहे.वेळीच उपस्थीत असलेल्या भीम सैनिकांनी मोडतोड करणाऱ्या जातीयवादी सोपान दत्तराव पवार याला पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतू या कृति मागे कोण आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी.आंबेडकरी समाजाच्या व संविधानप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून आपणास विनंती की, पूर्वरत त्याच ठिकाणी नवीन संविधन प्रतिकृती शिल्प बसवावे. पुतळ्याच्या दोन्हीं बाजूंनी सी सी टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत व त्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. यावेळी विनोद भानू कदम, वासुदेव रामचंद्र जाधव, मंगेश भास्कर गावकर, गुणाजी वासुदेव जाधव, मदन नामदेव परब, अशोक दत्ताराम कांबळे, अजित हरिश्चंद्र तांबे, अनंत लक्ष्मण असोलकर, मधू नारायण माडकर, संतोष जाधव, देवदत्त कदम, विद्याधर कदम, विश्वनाथ पडेलकर, महेश चव्हाण, देवदत्त चव्हाण, सुशील तांबे, गुरुनाथ कासले, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!