13 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

कणकवलीत आमदार नितेश राणे यांची प्रचार रॅली | रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदारकीची पूढील पाच वर्षे द्या शंभर टक्के बदल घडवू

आ. नितेश राणे यांचा मतदारांना विश्वास

कणकवली | मयुर ठाकूर : शहरात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ शहरातून शेकडो लोकांच्या उपस्थिती मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी बाजारपेठ मध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत आमदार नितेश राणे यांनीं यांनी आपण दहा वर्षात काय कामे केली याचा लेखाजोखा मांडला. यावेळी लोकांनी देखील आपण तुमच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच प्रलंबित असलेली आणि आता सुरू केलेली कामे पूर्ण करून दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पूढील पाच वर्षे द्या शंभर टक्के बदल घडवू असा विश्वास आ. नितेश राणे यांनी दिला.

यावेळी आ. निटेश राणे म्हणाले, प्रचारा बरोबर संवाद व जास्तीत जास्त जनसंपर्क मतदारांच्या पुढील पाच वर्षांच्या अपेक्षा काय आहेत. हे लोकप्रतिनिधी व उमेदवार म्हणून समजून घेण्यासाठी कणकवली बाजारपेठ मध्ये फिरलो. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचत आहे. २८२ गावांपैकी प्रत्येक गावामध्ये पोहोचलो आहे. सर्व बाजारपेठांमध्ये फिरलो. गेली दहा वर्ष आमदार म्हणून मी जी काही कामे केली आहेत हे माझ्या प्रत्येक मतदाराला जाणून घेण्याचा अधिकार आहे. म्हणून प्रत्येक मतदारापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. लोकं आता वीस तारीख ची वाट पाहत आहे. माझ्यामुळे लोकांना जो काय प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आता लोकांनी निर्णय घेतलेला आहे. लोकांनी गेली दहा वर्ष माझे काम बघितले आहे आणि जी काही सुरू केलेली विकास कामे आहेत ती पुढील पाच वर्षात कशी पुढे घेऊन जाता येतील त्याबाबत लोकांनी काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या आहेत. अजून पाच वर्षे मला दिली पाहिजेत. म्हणून येणाऱ्या २० तारीख ला कणकवली – देवगड – वैभववाडी ची जनता महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यावर आशीर्वाद ठेवतील, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवासेना जिल्हाप्रमुख शिवसेना मेहुल धुमाळे, माजी नगरसेवक किशोर राणे, ऍड. विराज भोसले, अभी मुसळे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, अंकुश जाधव, माजी नगरसेवक संजय कामतेकर, माजी नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, कविता राणे, मेघा सावंत, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, ओमकार सुतार संदीप नलावडे नाईक, अवधूत तळगावकर, संजना सदडेकर, विजय इंगळे, निखिल आचरेकर, ओम राणे, राजा पाटकर, बंडू गांगण, दामू सावंत, एम. एम. सावंत, कल्याण पारकर, संदीप नाटेकर, प्रिया टेमकर, भाजप शहराध्यक्ष महिला प्राची कर्पे, संजीवनी पवार, सरिता राऊत आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!