8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कणकवली मतदारसंघात ३३२ केंद्रांवर होणार मतदान

कणकवली : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यामध्ये मतदार संघातील ३३२ मतदान केंद्रांवर मंगळवारी येथील कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉल येथून ईव्हीएमसहित साहित्य रवाना करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २३०० अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून हे साहित्य रवाना झाले.

यामध्ये मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यासहित अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यात १३९७ कर्मचारी, जवळपास ७०० पोलीस व होमगार्ड, १०७ राखीव कर्मचारी, ४७ झोनल अधिकारी ६२ मायक्रो ऑब्जरवर असे सुमारे २३०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी ४५ एसटी बस व २७ जीप गाड्यांच्या माध्यमातून हे साहित्य रवाना करण्यात आले.

मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष सहित पोलीस कर्मचारी मिळून प्रत्येकी सहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच ५०% मतदान केंद्र वेबकास्टिंगने जोडण्यात आले आहेत.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्यासहित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे, लक्ष्मण कसेकर सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, संतोष नागावकर, मेघनाथ पाटील यांच्यासहित इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री. कातकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या बसेस रवाना करण्यात आल्या. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!