बेईमानी करणाऱ्या लोकांनी आरोप करू नये पारकरांनी सुरेश सावंत यांना फटकारले
राणेंना जनतेने खूप सारे दिले ; परंतु राणेंनी जनतेला काय दिले ?
कणकवली : उद्या कणकवली मतदारसंघात देवगड शहरात महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे दौऱ्यावर येत आहेत. आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा उद्या रविवारी देवगड शहरात होणार आहे. या सभेला गावागावातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले आहे. यावेळी ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे ते म्हणाले, आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील एक अभ्यासू नेतृत्व आहे. युवा सेनेच्या जडणघडणीकडे व संघटना वाढविण्यासाठी आदित्य ठाकरे हे मेहनत घेत आहेत. आदित्य ठाकरे हे सातत्याने मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्रातल्या सर्व राज्यातील जिल्ह्यांमध्ये दौरे करत आहेत. जनतेचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरुणाई मध्ये एक भगवा वातावरण महाविकास आघाडीच आणि शिवसेनेचे निर्माण होत असताना, दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना जनतेचा जो प्रतिसाद मिळाला, उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली त्या सभेला देखील मोठा प्रतिसाद जनतेने दिला, असेही श्री.पारकर म्हणाले.
खा. नारायण राणे यांनी संदेश पारकर यांना कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष पद दिले असा आरोप सुरेश सावंत यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देत श्री. पारकर म्हणाले कोण कोणाला पद देतो ..? राणेंनी किती पक्ष बदलले ? किती पक्षाबरोबर बेइमानी केली..? त्यामुळे बेईमानी करणाऱ्या लोकांनी असे आरोप करू नये, असे म्हणत सुरेश सावंत यांनी केलेले आरोप फटकारले.
ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी याच नारायण राणेंना राज्याचे मुख्यमंत्री केले. त्याच राणेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शिवसेनेची प्रामाणिक राहू शकले नाहीत. ज्या काँग्रेसने राणेंना महसूल मंत्री केलं. त्या सोनिया गांधीवर राणेंनी टीका केली. राणेंनी स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. त्यांना दोन महिन्यात स्वाभिमान पक्ष संपवावा लागला. राणेंच्या रक्तात, डीएनए मध्ये बेईमाने आहे. राणे जनतेशी देखील प्रामाणिक नाहीत. त्यामुळे असे आरोप त्यांनी करू नयेत, असा सल्ला श्री. पारकर यांनी दिला.
या मतदारसंघात एक उत्साही वातावरण आहे. लोक प्रस्थापितांच्या विरोधात आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत. घराणेशाहीच्या विरोधात आहेत. नितेश राणेंना जी काही पैशाची गुर्मी ती येणाऱ्या 23 नोव्हेंबरला जनता उतरवणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावामध्ये खोट आहे. हे या राज्याला किंवा तुम्हाला काही देणार नाही, आरएसएस हे हाफ पॅन्ट वाले आहेत. स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांचं कार्यालय ज्या पद्धतीने फोडण्यात आलं. त्यावर अंडी फेकण्याचे काम करण्यात आलं, ते कोणी केले असेल..? तर या नितेश राणेंनी केलेल आहे. विनोद तावडे नितेश राणेंच्या प्रचारासाठी मतदारसंघात आले. यावेळी त्यांनी बाहेरचा पालकमंत्री नको तर जिल्ह्यातील पालकमंत्री पाहिजे असे वक्तव्य केले. आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर अविश्वास दाखवला. तर नुकतेच व्हायरल झालेले कॉल रेकॉर्डिंग ज्यात देवेंद्र फडणवीस आणि विशाल परत बोलत आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस निवडणुक संपू दे मग राणेंच काय ते बघतो. त्यामुळे मूळ भाजप आणि राणे भाजप यांच्यात फार मोठी दरी आहे. सरडा जसा रंग बदलतो तसे राणे आपली भूमिका बदलत असतात. त्यामुळे जनतेला त्यांची जी नौटंकी आहे, स्टंटबाजी आहे, त्यावरून जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल व महाविकास आघाडी देखील त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. जनतेने राणेंना सगळी पद दिली. मात्र जनतेचा विकास झाला नाही. घराणेशाहीचा विकास झाला. त्यांच्या प्रॉपर्टीची वाढ झाली. सर्वसामान्य माणूस मात्र आजही अडचणीत आहे.
फडणवीस शरीराने येणार होते. मनाने येणार नव्हते. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांनी टीका केलेली आहे त्यांच्यावर शिव्यांची लाखोळी वाहिली आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यावेळी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी राणेंनी तिथे काय तमाशा केला.? त्यामुळे जनता यांना निवडणुकीच्या माध्यमातून जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.