8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

फेकू आमदार नितेश राणे यांच्या भुलथापाना मुस्लीम समाजाने बळी पडू नये- बंदेनवाज काझी

कणकवली : आमच्या मुस्लिम समाजाच्या जीवावर आ. नितेश राणेंनी दहा वर्षे आमदारकी भोगली आहे. नितेश राणेंनी निवडून येण्यापूर्वी आमच्या समाजाकडे येऊन मते मागताना, मी तुमच्या समाजाच्या पाठीशी आहे. मला मतदान करा असे सांगून मागील दोन निवडणुकांमध्ये मते घेतली. मात्र ,गेल्या १० वर्षात आमच्या मुस्लिम समाजांच्या वाड्याना विकासापासून दूर ठेवण्याचं काम या नितेश राणेंनी केले आहे.भाजपाचा १०५ आमदारांमध्ये एकच नितेश राणे मुस्लिम समाजावर टीका का करतात? त्यांना भाजपने कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का? त्यामुळे फेकू आमदार नितेश राणे यांच्या भुलथापाना मुस्लिम समाजाने बळी पडू नये,असे आवाहन कणकवलीचे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी केलं आहे.

कणकवली येथील जलतरंग हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आरिफ काझी ,आरिफ शेख,नासीर शेख, सोहेल चौगुले,आदिल चौगुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमच्या मुस्लिम समाजाच्या जीवावर गेली दहा वर्ष आमदारकीची नितेश राणे यांनी भोगली आहे. आमच्या समाजाला दोन्ही निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासने नितेश राणे यांनी पाळलेली नाहीत. समाजाला दुर्लक्षित ठेवण्याचं काम आमदार नितेश राणे यांनी केल आहे.आमच्या समाजाची फसवणूक करत विश्वासघात नितेश राणे यांनी केलेला आहे.

नितेश राणे एकदा काँग्रेसमधून तर दुसऱ्यांदा भाजपातुन निवडणुक लढले.आमच्या मुस्लीम बांधवांनी त्यांना साथ दिली. मत मागताना नितेश राणे सांगत होते, तुमच्या पाठीशी रहाणार,. मात्र १० वर्षे आमदारकी भोगल्यानंतर आपले रंग दाखवयला सुरुवात केली. सातत्याने मंत्री पद मिळेल म्हणुन मुस्लीम समाजावर टिका करुन धमकी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. नितेश राणेंनी सर्वसमभाव सोडलेला आहे. ते जातीवाचक बोलुन आमच्या समाजाला बाजुला करण्याचे काम करत आहेत. आता या निवडणुकीत माझा मुस्लीम समाज माझ्या पाठीशी आहे. जरीही नितेश राणेंसोबत काही लोक शरीराने त्यांच्यासोबत आहेत, मात्र मला फोन करुन आमचे बांधव आम्ही तुमच्यासोबत आहे, असे सांगत आहेत. त्यामुळे आ.नितेश राणे यांचा पराभव निश्चीत असल्याचे मत अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केले.
भाजपाचे मोदी व शाहा यांचे धोरण ..सबका साथ सबका विकास आहे.. मग नितेश राणे जातीवाचक का वागतात? मुस्लीम समाजावर भडकावु का बोलतात? आमच्या समाजाच्या मुशीदीत मुस्लीम बांधवांना मारण्याची धमकी का देतात? असल्या फेकु आमदाराच्या जनतेने पाठीशी राहु नये. नितेश राणे यांनी पहिल्यांदा दिल्लीत जावुन ..सबका साथ सबका विकास..यावर धोरण निश्चीत करावे. नंतर आमच्या लोकांशी चर्चा करावी. मंत्रीपद मिळविण्यासाठी ही काही महिन्यांपासुन बडबड सुरु आहे. त्यामुळे आम्हाला जाती वाद नको,आपण एकात्मता घेवून विकास केला पाहिजे. आमच्या समाजाने अशा आमदाराला परत संधी देवू नका. समाजाची भावना घेवुन लढाईत उतरलो आहे. हा लढा मी जिंकुन दाखवेन असा विश्वास बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केला.
काल आपल्या बस स्थानकात दुर्दैवी अपघात होवुन फातिमा हीचा मृत्यू झाला आहे.त्यात दोषी चालक, वाहक, संबंधित अधिकारी याचे निलंबन करण्याची मागणी मी केली आहे. संबंधित कुटुंबियांचे सांत्वन करुन आधार देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचे भेट घेणार आहे. संदेश पारकर यांच्या कर्जासंदर्भात २३ तारीखला अधिकृत भुमिका जाहीर करणार असल्याचे श्री. खानी यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!