17.9 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

…हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवाच

उबाठा शिवसेना उपनेते शरद कोळी यांचे आव्हान

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेला येण्यापासून अडवणुकीचे भाषा करणारे खासदार नारायण राणे व त्यांचे पुत्र बिळात लपले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी अडवून दाखवावेच, असे आवाहन उबाठा शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना आव्हान दिले आहे.

कोळी पुढे म्हणाले, खासदार नारायण राणे यांना राज्यात प्रचारसभेसाठी कोणी बोलवत नाही. त्यामुळे ते केवळ सिंधुदुर्गातच प्रचारात गुंतले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला, नीलेश राणे यांना भाजपमधून तिकिट दिल्यास त्यांचा पराभव निश्चित आहे, हे भाजपला माहीत होते आणि त्यामुळेच त्यांनी बक्षीस म्हणून त्यांना पराभवासाठी शिवसेना शिंदे गटात सोडले आहे, असेही त्यांनी टीका केली. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही टीका करताना शिक्षण खात्यातील त्यांच्या अनेक भानगडी उघड करू त्यांनी शिक्षण खात्याचा कारभार घेतल्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचे वाटोळे केल्याची टीका त्यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारसभेसाठी उद्धव ठाकरे हे येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोळी मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यांनी सावंतवाडीत सभास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोण अडवतो, हे मला बघायचेच आहे. हिम्मत असेल तर त्यांनी अडवून दाखवावे. त्यासाठीच मी अगोदरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आहे. नारायण राणे व त्यांचे पुत्र कुठेतरी बिळात लपले आहेत. त्यामुळे ठाकरे ना सोडाच, मलाच अडवण्याची हिंमत त्यांना झाली नाही. राणे हे घराणेशाहीवर बोलत आहेत. खरंतर जे पक्षाचे मालक आहेत, त्यांच्या घराणेशाहीवर बोलण्याचा यांना अधिकार काय? राणे व त्यांची दोन्ही मुले एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारत आहेत. पक्षात प्रदेश मागण्यासाठी ते भीक मागत दारोदारी फिरत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षांच्या प्रमुखांबद्दल काय समजणार? असा टोलाही त्यांनी लगावला.

केसरकरांच्या चेहऱ्यावर जाऊ नका !

महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, त्यांचा चेहरा गरीब वाटतो. त्यामुळे कोणी त्यांना भूलतं. त्यांच्या चेहऱ्यावर कुणी जाऊ नये. खरा वेगळा व दाखवायचा चेहरा वेगळा अशी त्यांची वृत्ती आहे. त्यांनी गद्दारी केली, त्याचवेळी हे लक्षात आले. त्यांचा उद्या मी समाचार घेणार आहे. शिक्षण खात्यात आतापर्यंत कधी घोटाळा झाला नाही, एवढा घोटाळा त्यांच्या काळात झाला आहे. त्यांनी शिक्षणाचे वाटोळे केले. कंत्राटी प्रवृत्ती आणली. शाळेत विद्यार्थी जात नाही, शिक्षकांच्या समस्या ते सोडवत नाहीत. शाळा विकायला काढल्या आहेत. महाराष्ट्रात मी गेली अडीच वर्षे फिरत आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार वातावरण आहे. त्यामुळे त्याचा फटका लोकसभेला बसला आहे. आताही विधानसभेत त्यांना बसणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सत्ता निश्चितपणे येणारच आहे. लोकसभेत पराभव झाल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. परंतु, महागाई वाढली. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी पहिली कर्जमाफी केली, आता आमचे सरकार आल्यावर कुटल्याही कागदपत्राविना आम्ही त्यांना ३००० दर महिना लाडक्या बहिणीला देणार आणि त्यांची कर्जमाफी करणार, यांना जर लाडक्या बहिणीला बक्षीस द्यायचे होते तर त्याने मुलांच्या शिक्षणाबद्दल का विचार केला नाही. आरोग्याच्या प्रश्नाबाबत काम केले नाही, असा सवालही त्यांनी केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!