सावंतवाडी : तुमचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्ही मला एक मत द्या, माझ उर्वरित आयुष्य तुम्हाला देईन, तुमच्या सेवेसाठी देईन ! एवढा विश्वास ठेवा आणि मला ३ नंबर पाकीट या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे-परब यांनी केले. सौ घारे-परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात शेर्ले गावाची ग्रामदेवता श्री देवी माऊलीचे आशीर्वाद घेऊन सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन केली. शेर्ले , कास , निगुडे , रोणापाल, मडुरा , पाडलोस , आरोस , सातार्डा , कावठणी , तळवणे येथील ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत व खळा बैठका घेत तसेच व्यापारी वर्गांच्या गाठीभेटी घेत प्रचारामध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे.
सौ.घारे-परब जनतेमध्ये गेल्या तेव्हा गावातील ग्रामस्थ मंडळी यांच्याकडून अनेक समस्यांचा पाढा वाचला गेला. आरोग्य, रस्ते , पाणी , वीज , शाळांच्या झालेल्या दुरावस्था , रोजगाराच अशा अनेक प्रश्नांविषयी सत्ताधारी आमदार , नेते मंडळी यांच्या बद्दल असंतोष पाहायला मिळाला. यावेळी अर्चना घारे परब या आपल्या भाषणातून बोलताना म्हणाल्या की, आपण गेली अनेक वर्ष सातत्याने या विधानसभा मतदार संघात काम करीत आहे. असे असताना देखील एखादा व्यक्ती इतर पक्षातून आयात करून घेतला जातो आणि अशा व्यक्तीला उमेदवारी जाहीर होते हे खूप मनाला वेदना आणि दुःख देणारे होते. परंतु आज मी जी काही या निवडणुकीच्या रिंगणात आहे ती फक्त तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने जनतेच्या सेवेसाठी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी म्हणून उभी आहे. त्यामुळे आज या विधानसभा मतदार संघात असलेले प्रश्न हे माझे प्रश्न आहेत. मी एक सर्वसामान्य जनतेची प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहिन. आज जर आपण पाहिले तर सत्ताधारी नेते हे रोज सकाळी उठून प्रेस घेतात आणि एकमेकांवर टीका , चिखलफेक करत आहेत. यांना इथल्या आरोग्य , रोजगार असे अनेक मोठे प्रश्न आहेत हे सोडविण्यात काही रस नाही आहे. शेतकरी बांधवांच्या मालाला हमीभाव , पीक विमा असे प्रलंबित प्रश्न सोडवायला यांना वेळ नाही आहे. आणि शेवटी मग मत विकत घ्यायची आणि निवडून यायचे असे यांचे ठरले आहे. आताची ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. परंतु माझी कोकणची स्वाभिमानी जनता ही विकली जाणार नाही असा विश्वास देखील अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला.
यावेळी अर्चना घारे परब यांच्या समवेत पुंडलिक दळवी ,नितेशा नाईक ,सुनिता भाईप ,मयुरी भाईप ,निलेश परब , नारायण घोगळे ,संजय भाईप ,एकनाथ धुरी ,दयानंद धुरी ,साई धुरी ,रजत धुरी ,नंदकिशोर नेमन ,बाबू कुबल ,गणपत पराडकर , साबाजी रेडकर , निलेश गावडे , योगेश साळगावकर , अलीशा गोठसकर , विवेक गवस ,मयूर कामत ,प्रसाद परब आदी गावातील सर्व ग्रामस्थ, महिला , कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारास उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त करत अर्चना घारे परब यांना शुभेछा दिल्या.