8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कणकवली विधानसभा मतदारसंघातही आता परिवर्तन अटळ – अनंत पिळणकर

कणकवली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. राज्याप्रमाणेच कणकवली विधानसभा मतदारसंघातही आता परिवर्तन अटळ असून जनतेने भ्रष्टाचारी आमदार नितेश राणेंना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्ष पदाधिकाऱ्यांची आता मोठी जबाबदारी आहे. कार्यकर्त्यानी आता ही निवडणूक हातात घेतली असून महाविकास आघाडीच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी आता पेटून उठले पाहिजे. मागील 35 वर्षे सिंधुदुर्गात सुरू असलेली राणेंची घराणेशाही संपविण्याची हीच वेळ आहे. राणेंसारख्या रावणाची लंका दहन करून महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी मला आमदार म्हणून संधी द्या असे आवाहन संदेश पारकर यांनी केले. कणकवली विधानसभेचे महाविकास आघाडी चे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कणकवली तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पिळणकर यांच्या नवीन कुर्ली वसाहत येथील निवासस्थानी पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून संदेश पारकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अनंत पिळणकर म्हणाले की संदेश पारकर हे मागील 35 वर्षे सातत्याने दहशतीविरोधात लढत आहेत. राणेंसारख्या प्रवृत्तींचा बिमोड करण्याची संधी विधानसभा निवडणुकीत मिळाली आहे. संदेश पारकर याना काककवली देवगड वैभववाडी मतदारसंघात प्रचारादरम्यान जनतेचा भरघोस पाठिंबा आणि प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील आमदार संदेश पारकर आहेत. पारकर यांच्या विजयासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करून पारकर यांचा विजय साकारुया. यावेळी कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली उपतालुकाध्यक्ष प्रवीण कुडतरकर. उपतालुकाध्यक्ष मारुती पवार, उप तालुकाध्यक्ष महेश चव्हाण, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, वैद्यकीय सेल प्रांतिक सदस्य विकास मंगल. आर पी आय चे विश्वनाथ

कदम.

निखिल गोवेकर. संतोष चव्हाण. अमित पुजारे. संदेश मयेकर. उत्तम तेली. अशोक पवार. रमेश राणे. विशाल राणे. प्रीतम राणे. तुषार पिळणकर. सुजल शेलार. रुपेश माळी. रुपेश पवार. कुर्ली ग्रामपंचायत सदस्य योगेश कदम. राजेंद्र वाघाटे. रोहित वाघाटे. गुरु येंडे. प्रथमेश शेंडे. दीपक सुतार. जयवंत कामतेकर. मुन्ना जाधव. शंकर राणे. प्रवीण पार्टी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!