1.4 C
New York
Thursday, December 11, 2025

Buy now

वैभव नाईक भंपकगिरी बंद करा, आणाव प्रवेशावर दादा साईल यांची संतप्त प्रतिक्रिया

सदानंद आणावकर भाजपाचे प्राथमिक सदस्य देखील नाहीत, असल्यास सिद्ध करा, वैभव नाईक यांना आव्हान

कुडाळ : वैभव नाईक यांच्या खोट्या प्रवेशांचे नाटक सुरूच आहे त्याचा दुसरा अंक काल अणावं गावामध्ये पाहायला मिळाला मुळातच सेनेत असलेल्या सदानंद अणावकर यांचा खोटा प्रवेश घेऊन वैभव नाईक आपल्या खोट्या कर्तृत्वाचे धिंडोरे पिटत आहेत. सदानंद अनावकर हे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही पदावर नसून ते भाजपाचे प्राथमिक सदस्य देखील नाहीत. असल्यास वैभव नाईक यांनी पुरावे द्यावेत अस आवाहन भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केले आहे.

२००३ मध्ये माननीय राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे सदानंद अणावकर यांनी अणाव गावचे उपसरपंच पद भूषविले परंतु त्यानंतर मात्र त्यांनी राणे साहेबांची साथ सोडली त्यामुळे त्यांना राणे समर्थक बिरुदावली लावण्याचा कोणताही अधिकार नाही अशी टीका भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!