3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

वर्देत भाजपा कडून पलटवार, वैभव नाईक यांना धक्का

खासदार नारायणराव राणे, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा गटाच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसहित माजी सरपंच, प्रमुख मानकरी भाजपात

कुडाळ तालुक्यातील वर्दे येथुन आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का बसला असून वर्दे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज जाधव व संपदा जाधव यांच्यासह वर्दे माजी सरपंच श्री. सदाशिव पालव, यांनी खासदार नारायणराव राणे, व महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यांच्या सोबत माजी सदस्य सुरेश पालव, वर्दे गावचे मानकरी जयप्रकाश पालव, चंद्रशेखर पालव, सिद्धेश पालव यांचा पक्षप्रवेश पार पडला.

यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा, सरचिटणीस देवेन सामंत, माजी जि. प. अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष तुषार सावंत, गुंडू सावंत, हरिश्चंद्र गायतोंडे, योगेश परब, सुधीर सावंत, लक्ष्मण कदम, संजय कदम आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!